आनंदनगरची बेंजो पार्टी अर्थात शिकणारे बिझनेसमन!
तो दिवस सारा आनंदात गेला. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ किंवा ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ या संतकाव्याची साक्षात प्रचिती मला आली. आणि हो, या एका छोट्या उपक्रमामुळे चाईल्ड लेबर, गैरहजर, मवाली इत्यादी सारी दूषणं पुसली गेली. आणि जीवनाच्या प्रवाहात शिक्षणाची संगत घेऊन माझी मुलं पोहायला शिकू लागली.......